खुशखबर! लाडक्या बहिणींना एकदम ४५०० रुपये अन्‌ शेतकऱ्यांना एकदम मिळणार ६००० रुपये; ‘या’ महिन्यात मिळणार शासनाकडून लाभ, Ladki Bahin Yojana Insttalment And PM Kisan Insttalment Update

Ladki Bahin Yojana Insttalment And PM Kisan Insttalment Update:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सव्वादोन कोटी महिलांना डिसेंबरपासून लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे सन्मान निधीतील ९३ लाख शेतकरी देखील राज्य सरकारच्या आठव्या व नवव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दोन्ही योजनांचे हप्ते वितरित करण्यासाठी १४ हजार कोटींची आवश्यकता असून वित्त विभागाकडून निधी अजून मंजूर झालेला नाही. या लाभार्थींना आता फेब्रुवारी-मार्च महिन्यात एकदम लाभ मिळणार आहे.

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सव्वादोन कोटी महिलांना डिसेंबरपासून लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे सन्मान निधीतील ९३ लाख शेतकरी देखील राज्य सरकारच्या आठव्या व नवव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दोन्ही योजनांचे हप्ते वितरित करण्यासाठी १४ हजार कोटींची आवश्यकता असून वित्त विभागाकडून निधी अजून मंजूर झालेला नाही. या लाभार्थींना आता फेब्रुवारी-मार्च महिन्यात एकदम लाभ मिळणार आहे.

महत्त्वाची माहित

पाहण्यासाठी येथे

क्लिक करा

लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पडताळणीअंती साधारणत: दीड कोटींपर्यंत महिला योजनेसाठी पात्र राहतील, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. निकषांच्या पडताळणीनंतर दरमहा १६३५ कोटी म्हणजेच वर्षाला १९ हजार ६२० कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असाही अंदाज आहे. दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा केंद्र शासनाचा २२ वा हप्ता फेब्रुवारीअखेर वितरित होईल.

त्यानंतर राज्य सरकारकडून आठवा आणि नववा हप्ता (प्रत्येकी ४००० रुपये) मिळेल. ‘ॲग्रीस्टॅक’मधून सन्मान निधीतील लाभार्थींची पडताळणी झाली असून त्यानुसार राज्यातील ९१ लाख १६ हजार शेतकऱ्यांना केंद्र शासनाचा २२ वा हप्ता वितरित होईल. त्याच शेतकऱ्यांना राज्याचे दोन हप्ते मिळतील, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

एप्रिलपासून पात्र बहिणींच लाडक्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. आगामी आर्थिक वर्षापासून (१ एप्रिल २०२६) निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये दरमहा मिळतील.

१ जुलै २०२४ रोजी सुरू झालेल्या योजनेअंतर्गत सुमारे ५० लाखांहून अधिक अपात्र महिलांनी देखील अर्ज केले होते, हे पडताळणीतून समार आले आहे. त्यात राज्य व केंद्र सरकारच्या पूर्वीच्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणारे, चारचाकी असलेले, घरात सरकारी नोकरदार असतानाही लाभ घेणारे, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिला, सरकारी नोकरदार, पुरुष आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणारे आहेत.

पी एम किसान शेतकरी

लाभार्थी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पात्र महिलांचा लाभ नियमित सुरु राहील

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थींना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निकषांनुसार पात्र सर्व लाडक्या बहिणींना योजनेचा दरमहा नियमित लाभ मिळेल. अपात्र महिलांचा लाभ मात्र बंद होईल.

– प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर

दोन योजनांचे लाभार्थी अन्‌ अपेक्षित निधी

‘लाडकी बहीण’चे सध्याचे लाभार्थी

२.३२ कोटी

‘सन्मान निधी’चे शेतकरी लाभार्थी

९१.१६ लाख

दोन्ही लाभार्थींसाठी अपेक्षित निधी

१४,००० कोटी

लाडक्या बहिणींचे थांबले हप्ते

३ शेतकऱ्यांचे थांबलेले हप्ते

लाडकी बहीण लाभार्थी यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक

करा

Leave a Comment