बापरे बाप ! वाघाच्या वाटेत आडवा आला भला मोठा अजगर, तो असा घाबरला की… VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.Viral Video

Viral Video: वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांची दहशत फक्त जंगलातील प्राण्यांमध्येच नाही, तर मनुष्यवस्तीतही पाहायला मिळते. हे हिंस्र प्राणी आपली भूक मिटविण्यासाठी कधी कोणावर हल्ला करतील हे कोणीही सांगू शकत नाही. त्यांच्या हल्ल्याचे अनेक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. त्यात ते खूप क्रूरपणे इतर प्राणी किंवा मनुष्यांवर हल्ला करताना दिसतात.

सोशल मीडियावर प्राण्यांचे असे विविध व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यातील बरेचसे व्हिडीओ थरराक, तर काही व्हिडीओ मजेशीरही असतात. जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ म्हटल्यावर युजर्सही ते आवडीने पाहतात. कारण- त्यातील अनेक गोष्टी आपल्यासाठी कधीही न पाहिलेल्या किंवा अधिक माहिती मिळवून देणाऱ्या असतात. दरम्यान, आता एका वाघाचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे; ज्यात तो चक्क एका भल्या मोठ्या अजगराला घाबरल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी जंगलातील दोन विषारी नागांचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ते दोन्ही नाग एकमेकांबरोबर भांडण करताना दिसत होते. दरम्यान, आता या अशाच भल्या मोठ्या अजगराला पाहून वाघ घाबरल्याचे दिसत आहे जे पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलामध्ये वाघ निवांत फिरत असून तो फिरत असलेल्या वाटेवर त्याला अचानक एक भला मोठा अजगर पसरलेला दिसतो. अजगरामुळे वाघाला पुढे जाण्यासाठी अडथळा येतो, भल्या मोठ्या अजगराला पाहून वाघ पुढे जाण्यास दचकतो आणि मागे फिरतो. सगळे प्राणी ज्याला पाहून लपतात असा वाघ चक्क एका अजगराला घाबरल्याचे पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @siva0063 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्सही मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बापरे, मी जर तिथे असतो, तर भीतीनंच गेलो असतो.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप भयानक आहे” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “वाघाची चांगलीच जिरली” आणखी एकाने लिहिलेय, “बापरे किती मोठा अजगर आहे हा”

Leave a Comment