Bharat Bandh 12 Feb 2026: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद; बँका, सरकारी कार्यालये, वाहतूक सेवा, बाजारपेठांवर होणार परिणाम

Bharat Bandh 12 Feb 2026: केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांकडून आज देशव्यापी भारत बंदची (Bharat Bandh 12 Feb 2026) हाक देण्यात आली आहे. देशभरातून विविध कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार आज या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. बंदमुळे देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालये, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Bharat Bandh 12 Feb 2026)

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 29 कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांसारख्या शेतकरी संघटनांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिलाय. तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 2 वाजता देशभरात संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे. (Bharat Bandh 12 Feb 2026)

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

संपामागील कारणं आणि मागण्या काय? (Bharat Bandh 12 Feb 2026)

केंद्र सरकारने गेल्यावर्षी 29 कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरुद्ध कामगार संघटनांनी हा एल्गार पुकारला आहे.

नवीन संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होणार असून नोकरीची सुरक्षितता धोक्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त, खासगीकरण, वेतनातील तफावत, वीज दुरुस्ती विधेयक, बियाणे विधेयकाचा मसुदा आणि ‘पीस’ कायदा रद्द करावा.

मनरेगा योजना पुनर्संचयित करण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे.

कोणत्या सेवांना बसू शकतो बंदचा फटका? (bharat bandh what open what closed and full list )

सरकारी कार्यालये आणि बाजारपेठा

सरकारी बँका आणि विमा कार्यालये

कारखाने आणि कंपन्या

बाजार समित्या, भाजी मंडया

केरळ, ओडिशा, कर्नाटकात अधिक परिणाम शक्य

अत्यावश्यक सेवा-सुविधांना बंदमधून वगळले

विमानतळे आणि विमान सेवा सुरु राहणार

बँका, विम्याच्या ऑनलाइन सेवा सुरू राहणार

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी,

भारत बंद संबंधित महत्त्वाची

माहिती पाहण्यासाठी येथे

क्लिक करा 

Leave a Comment