बापरे ! बोरिवलीत तरुणीचा धक्कादायक प्रताप; चिमुकलीच्या गळ्यातली चैन कशी चोरी केली पाहाच, VIDEO बघून शॉक व्हाल. Girl Chain Viral video

Girl Chain Viral video:लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. नुकताच मंबईतील बोरीवली या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल.

आजपर्यंत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातल्या मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अनेकदा अशा घटनांमध्ये महिलांचा जीव जातो, तर काहींना गंभीर दुखापतही होते. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय,जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मुंबईत एका लहान मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चोरी व्हायरल व्हिडिओ

पाहण्यासाठी येथे क्लिक

करा 

यामध्ये एका तरुणीनं चक्क लहान मुलीच्या गळ्यातली सोन्याची चैन चोरी केली आहे. या चोरीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल. ही घटना बोरीवलीतील काजूपाडा परिसरात घडली असून, सोनसाखळी हिसकावून संबंधित महिला घटनास्थळावरून पळून गेली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी येते आणि लहान मुलगी तिच्या आजीसोबत भाजी घेत असताना तिच्या बाजूला उभी राहते. पुढे ती चिमुकलीच्या गळ्यातली चैन लंपास करण्याचा प्रयत्न करते मात्र तिचा पहिला प्रयत्न फसतो. तेव्हा ती भाजी घेण्याचं नाटक करते आणि पुन्हा बॅगेतून काहीतरी काढत चिमुकलीच्या गळ्यातली चैन तोडते आणि तिथून पळून जाते. यावेळी चिमुकलीच्या आजीचा काहीतरी वेगळं घडल्याचं लक्षात येतं मात्र तोपर्यंत त्या तरुणीनं तिथून पळ काढलेला होता. अशाप्रकारे घडलेल्या या घटनेने परिसरात घबराहट निर्माण झाली आहे.

पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडिओ

पाहण्यासाठी येथे क्लिक

करा 

 

Leave a Comment