HSRP नंबरप्लेटबाबत मोठी अपडेट! 15 फेब्रुवारीपासून होणार कारवाई, किती दंड भरावा लागेल?HSRP Number Plate Deadline

HSRP नंबरप्लेटबाबत मोठी अपडेट! 15 फेब्रुवारीपासून होणार कारवाई, किती दंड भरावा लागेल?

HSRP Number Plate Deadline: राज्यात २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसविणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आले. जानेवारी २०२५ पासून या नंबरप्लेट बसविण्यास सुरुवात केली आहे.

उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी पाच वेळा मुदतवाढ देऊनही पुण्यासह राज्यातून त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन विभागाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून उच्च सुरक्षा नंबरप्लेट न लावलेल्या वाहनांवर कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाची माहिती जाणून

घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार होती. त्यापैकी आतापर्यंत दहा लाख ७० हजार वाहनचालकांनी नंबरप्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली आहे. आठ लाख ६२ हजार वाहनांना नंबरप्लेट बसविण्यात आली आहे. पुण्यात अद्यापही १५ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. पण, वाहन चालकांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही.

पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार होती. त्यापैकी आतापर्यंत दहा लाख ७० हजार वाहनचालकांनी नंबरप्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली आहे. आठ लाख ६२ हजार वाहनांना नंबरप्लेट बसविण्यात आली आहे. पुण्यात अद्यापही १५ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. पण, वाहन चालकांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही.

परिवहन विभागाने आतापर्यंत नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० एप्रिल, ३० जून आणि १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर अशी मुदतवाढ दिली होती. पण, या काळात अनेक वाहनचालकांनी नंबरप्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली आहे. ३१ डिसेंबरला मुदत संपल्यानंतरदेखील परिवहन विभागाने कारवाई सुरू केली नाही. वाहनचालकांना काही कालावधी मिळावा म्हणून थांबले; पण वाहनचालक गंभीर नसल्याचे दिसून आल्यामुळे आता कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.

बापरे ! बोरिवलीत तरुणीचा धक्कादायक प्रताप; चिमुकलीच्या गळ्यातली चैन कशी चोरी केली पाहाच, VIDEO बघून शॉक व्हाल. Girl Chain Viral video

याबाबत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की मुदतीपूर्वी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना मर्यादित अतिरिक्त वेळ देण्यात आला असला, तरी मुदतीनंतर अपॉइंटमेंट घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहनांच्या तपासणीदरम्यान वाहनांची सुरक्षा नंबर प्लेट, विमा, पीयूसी आणि वाहनचालक परवाना यांचीही पडताळणी केली जाणार आहे. साधारण १५ फेब्रुवारीनंतर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. कोणत्याही वाहनधारकाला आता आणखी वेळ मिळणार नाही.

वाहनांची सुरक्षितता वाढावी, वाहनांचा गैरकृत्यांसाठी वापर टाळता यावा, वाहन क्रमांकाच्या आधारे वाहनचालकांचा माग काढणे अधिक सुलभ व्हावे आदी हेतूंनी सरकारने उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात ‘एचएसआरपी ’ बसवणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी गेल्या वर्षाीपासून मोहीमही राबविण्यात येत आहे. प्लेट बसविण्याची केंद्रेही वाढवली आहेत. नंबरप्लेट बसवलेली नसल्यात वाहनचालकांना १००० रुपयांपासून ते १०००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

राज्यात नंबरप्लेट बसविण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. पुण्यातच अजून १५ लाख वाहनांना नंबरप्लेट बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहन विभागाने नंबरप्लेट बसविण्यासाठी आणखी दोन महिने तरी मुदतवाढ द्यावी. – बापू भावे, रिक्षा फेडरेशन

पुण्यात नंबरप्लेट बसवण्याचे प्रमाण अद्याप कमी असून, मोठ्या संख्येने वाहनांनी नियमाचे पालन केलेले नाही. काही फिटमेंट केंद्रांवर अपॉइंटमेंट असूनही वाहनधारक वेळेवर न आल्याने प्रक्रियेत अडथळे येत असल्याचेही दिसून आले आहे. – परिवहन अधिकारी

२५ लाख- पुण्यातील वाहनांची सुमारे संख्या

१०.७० लाख- ‘एचएसआरपी’ साठी नोंदणी केलेली वाहने

८.६२ लाख- नवीन नंबरप्लेट बसवलेली वाहने

अधिक माहिती येथे क्लिक

करून पहा

Leave a Comment